प्रेस न्यूज

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. महेंद्र महाजन, उपाध्यक्षपदी डॉ. सोमनाथ वडनेरे तर सचिवपदी श्री अरुण सपकाळे यांची बिनविरोध निवड

जळगाव ( दि. 23 ) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ  कर्मचारी सहकारी पतपेढीच्या सन 2023 ते 28 च्या कालावधी साठी झालेल्या निवडणुकीत डॉ. महेंद्र महाजन यांची अध्यक्षपदी डॉ.सोमनाथ वडनेरे यांची उपाध्यक्षपदी तर  श्री अरुण सपकाळे यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली

कार्यकारणीतील इतर सदस्यमध्ये श्री राजू सोनवणे, डॉ. दिनेश लाड,  श्री संजय ठाकरे,  श्रीअशोक पाटील, श्रीमती वैशाली शर्मा, सौ. जयश्री देशमुख, डॉ.अनिल लोहार,  श्री दीपक गावित आदींचा समावेश आहे

पीएचडी विद्याविभूषित संचालक

या निवडणुकीत कार्यकारिणीवर  डॉ.सोमनाथ वडनेरे, डॉ. महेंद्र महाजन, डॉ. दिनेश लाड,डॉ.अनिल लोहार या चार पीएचडी विद्याविभूषित संचालकांची निवड प्रथमच  झालेली आहे. सदर कार्यकारिणीचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असून मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी श्री अजित पाटील यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड जाहीर केली.

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.