पतपेढीच्या विविध योजना
1.सभासदास भेट वस्तु योजना –
सन 2006 पासून पतपेढीने ही योजना सुरु केली असून रु. 475 ची भेट वस्तु सभासदाला दिली जात होती. या योजनेसाठीच्या निधीत कालानुरुप बदल करण्यात येवून ही योजना अखंडितपणे सुरु असून सन 2014-15 पासून या योजनेसाठीच्या निधीची तरतुद प्रत्येकी सभासदासाठी रु.2000/-इतकी करण्यात आली आहे. या भेट वस्तुच्या माध्यामातून दरवर्षी सभासदांना गृहउपयोगी वस्तु देण्याचा संचालक मंडळाने प्रयत्न केलेला असून गृहयोगी वस्तुंवर बाजारभावापेक्षा मोठया प्रमाणात सुट मिळवून सभासदांना या योजनेचा लाभ दिला जात आहे.
2.कन्यादान योजना –
सभासदांच्या कन्येचा विवाहप्रसंगी भेट वस्तु वा रोख स्वरुपात भेट देण्याबाबतची योजना पतपेढीने 2016 पासून सुरु केली त्यात सभासदाच्या कन्येच्या विवाहप्रसंगी रु.2000/- रकमेचा धनादेश दिला जात होता ही योजना कन्या विवाहपूर्ती मर्यादित असल्याने हया योजनेचा विस्तार करण्यात आला व सभासद पाल्य विवाह भेट योजना करण्यात येवून सभादाच्या कन्या व पूत्र दोनही पाल्यांसाठी ही योजना सन 2018 पासून लागू करण्यात आली असून रक्कम रु.2100/- करण्यात आली आहे.
3.सेवानिवृत्ती सत्कार सोहळा योजना –
विद्यापीठात यशस्वी सेवा करुन नियत वयोमानानुसार व स्वेच्छेने विद्यापीठ सेवेतून निवृत्त होणा-या सभासदांच्या सेवेचा यथोचित गौरव व्हावा हया उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली असून पतपेढीने सुरवातीपासून सभासदांचा सेवानिवृत्ती निमित गौरव केला जात होता या योजनेचा सन 2018 पासून विस्तार करण्यात येवून सेवानिवृत्ती निमित रु.2100/- या धनादेश, शॉल श्रीफळ देवून गौरव करण्यात येतो.या योजनेसाठी लागणा-या निधीची देखिल तरतुद करण्यात आली असून मृत्युफंड निधी जमा होणाज्या रकमेतील 25% निधी हा सेवानिवृती सत्कार सोहळा योजनेसाठी वापरला जाणार आहे. याबाबत वार्षिक सभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे.
4. विमा योजना –
पतपेढीने सभासदांच्या हिताच्या दृष्टीने विविध निर्णय घेऊन राबविलेल्या योजना जात आहेत. त्यत प्रामुख्याने उल्लेख करावाचा लागेल तो आहेत त्यत प्रामुख्याने उल्लेख करावाचा लागेल तो म्हणजे विमा योजनेचा. पतपेढीने प्रत्येक सभासदाचा एकूण चार लाख रुपये किंमतीचा अपघात विमा घेतलेला असून संकटकाळात सभासदांच्य मृत्यपश्चात कुटुंबाला आधार मिळावा या हेतूने विमा योजना सुरु करण्यात आला आहे. यासाठी लागणा-या प्रिमियमची रक्कम ही सभासदांना वर्गणीवर मिळणा-या व्याजाच्या रकमेतून भागविण्यात येते.
5.संचालक मंडळ प्रायोजित गुणवंत पाल्य गुणगौरव योजना –
सन 2013-2018 या कालावधीतील असलेल्या संचालक मंडळाने सभासदांच्या पाल्यानी संपादित केलेल्या यशाचा गौरव करण्याच्या दृष्टीने त्यांचा गौरव सन्मान करण्याचा निर्णय घेतला मात्र हे करत असतांना त्याचा आर्थिक भार पतपेढीवर पडणार नाही याची देखिल दखल घेतली व संचालक मंडळाला वार्षिक सभेत मिळणारा भत्ता रु.500/- न घेता सदर रकमेतून सभासदांच्या पाल्यांचा गौरव करण्यात याव अशी योजना तयार केली. त्यात प्रत्येकम संचालकाने त्यांना मिळणा-या वार्षिक सभेच्या भत्याची रक्कमेतून सभासदाच्या पाल्यांसाठी गुणगौरव योजन सुरु करण्यात आली. या योजनेतून सभासदांच्या 40 इतक्या पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला आहे. त्यात सभासदांच्या पाल्यांना प्रोत्याहन मिळावे या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेतून इ.10वी,12वी, पदवी,पदविका,पदव्युतर अभ्यासक्रमात सभासदांच्या पाल्यांमधून प्रथम येणा-या पाल्यांसाठी तसेच राज्यस्तरीय,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धा परीक्षा, क्रिडा स्पर्धात यश संपादन केलेल्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांसाठी ही योजना सुरु करण्यात आली.
6.गुणवंत पाल्य गुणगौरव योजना (सन 2019)
या वर्षापासूनच संचालक मंडळाने या योजनेचा शुभारंभ केला आहे. यासाठी लागणा-या निधीची कायमस्वरुपी तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यासाठी लागणारा निधी हा शासकीय लेखापरिक्षणाच्या फिमध्ये सुट मिळवून बचत केलेल्या निधीची रक्कम या योजनेत वर्ग करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जमा झालेल्या रकमेच्या व्याजाच्या रकमेतून इ.10 वी, 12 वी, पदवी व पदव्युत्तर स्तरावरील सभासदांच्या पाल्यांना गौरविण्यात येणार आहे. भविष्यात या योजनेचा विस्तार करण्यात येऊन शाखानिहाय सभासदांच्या पाल्यांना गौरव करण्यात येईल. तसेच क्रीडा प्रकारात यश संपादन करणाज्या गुणवंत पाल्यांचा देखिल यात समावेश करण्याचा प्रयत्न आहे. मा.कुलगुरु महोदयांना देखिल या योजनेत सहभागी होऊन सभासदांच्या दिव्यांग पाल्याला या योजनेचा लाभ दिला आहे.
7.मयत सभासद कर्जमुक्ती योजना –
सभासदांच्या दु:खद निधनानंतर कुटुंबाला आधार मिळावा त्यांची आर्थिक मदत लाभावी तसेच सभासदाला असलेल्या जामिनदारांवरील भार कमी होऊन पर्यायाने पतपेढीची वसुली होण्यास देखिल हातभार लागावा या सर्वंकष उद्देशाने वार्षिक सभेत या योजनेला मंजूर प्रदान करण्यात आली आहे. या योजनेची सुरुवात सन 2017-18 पासून देण्यात आली असून या योजनेंतर्गत सभासदाचा दुर्देवी मृत्यु झाल्यास त्याला कमाल दोन लाख रुपयांपर्यतचा लाभ या योजनेंतर्गत दिला जाईल.
8.मृत्यु निधी-
सभासदाच्या दु:खद निधनानंतर त्याच्या कुटूंबाला आधार मिळावा या उद्देशाने तात्काळ मदत म्हणून रु.50000/- मृत्यनिधी योजना पतपेढीने सुरु केलेली आहे.
दहावीला प्रथम विद्यार्थ्याला बक्षीस :
दहावीला प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला प्रमोद पाटील यांच्याकडून त्यांच्या मुलाच्या स्मृती पित्यर्थ बक्षीस दिले जाते
प्रास्तावित योजना-
रौष्यमहोत्सवी वर्षात यशस्वी वाटचाल करतांना भविष्यात पतपेढीच्या माध्यमातून सहकार विभागांतर्गत असलेल्या ग्राहक भाडार उभरण्याचा प्रयत्न असून यासाठी सभासदांच्या मतानुसार पतपेढीमार्फत अथवा स्वतंत्ररित्या ग्राहक भांडाराची सहकार तत्वावर उभारणी करण्यात प्रयत्न करण्यात येणार आहे. ग्राहक भाडाराचा फक्त सभासदांसाठी न करता विद्यापीठात प्रवेशित सभासदांसाठी न करता विद्यापीठात प्रवेशित असलेल्या सुमारे 2 ते 3 हजार विद्याथ्र्यांना शैक्षणिक साहित्य देखिल यामाध्यामातून उपलब्ध करुन विद्यापीठाच्या मा.कुलगुरु महोदयांसमवेत भविष्यकालीन योजनाबाबत सविस्तर चर्चा करुन विद्यापीठाच्या सहकार्याने या योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाचा असेल, ग्राहक भांडाराच्या माध्यमातून सभासदांच्या कौटुबिक गरजा किमान दरात उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न असेल.
स्कूल/ अकादमी –
पतपेढी सभासद, पाल्य यांच्याबरोबरच समाजाचा देखिल देणं लागतो, त्याच भावनेने प्रेरित होऊन समाजातील गरिब, होतकरु मुलांसाठी अकादमी सुरु करण्याचा मानस असून यासाठी पतेपेढीच्या वतीने अथवा स्वतंत्रपणे आवश्यक त्या मंजूरी घेवून विद्यापीठ कर्मचाज्यांच्या सहकार्याने,सहकारी अथवा धर्मदाय नोंदणीने अकादमी सुरु करण्याचा प्रयत्न असून विद्यापीठ कर्मचाज्यांचा समाजाप्रती असलेली आस्था व समाजासाठी काही करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.
वैद्यकीय सुविधा-
पतपेढीच्या माध्यमातून सभासदांच्या अरोग्याच्या दृष्टीने विविध विवध वैद्यकीय तपासणी शिबीरांचे आयोजन करणे, आवश्यकतेनुसार अल्प दरात वैद्यकीय सुविधेसाठी कर्ज योजना सुरु करण्याचा प्रयत्न असून वैद्यकीय सुविधा पुरविणारी योजना कंपनी कार्यन्वित करण्याचा प्रयत्न आहे.
