वेब संपादकीय

वेब संपादकीय,

 

माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रभाव प्रत्येक क्षेत्रात आहे. बँकिग आणि फायनान्स क्षेत्रात तर अत्यावश्यक सुविधा म्हणून माहिती आणि तंत्रज्ञानाच्या साधनांकडे पाहिले जाते.  पतसंस्था, पतपेढ्याही यास अपवाद नाही. सन 1995 ला स्थापन झालेल्या व नुकतेच आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचा·यांची सहकारी पतपेढीला टेक्नोसेव्ही बनविण्याचे स्वप्न बाळगून माहिती आणि तंत्रज्ञानाच्या साधनांचा अवलंब पतपेढीच्या कामकाजात व्हावा यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाच्या काही मुलभूत सुविधा सुरु करीत आहोत.

 

माहिती आणि तंत्रज्ञानाचे क्षेत्र फार विस्तीर्ण आहे. तशाच त्याच्या सुविधाही ब·याच आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात काही मुलभूत टेक्नोसेव्ही सुविधा सुरू केल्या आहेत. जसे की पेपरलेस प्रशासनाच्या दृष्टीने ईमेल एड्रेस, जागतिक पातळीवर पतपेढीची ओळख व्हावी म्हणून पतपेढीची अद्ययावत वेबसाईट, विविध कार्यक्रम, उपक्रमांच्या व्हीडिओ अथवा लाइव्ह प्रसारणासाठी  युट्यूब चॅनल, पतपेढीच्या योजना समाजापर्यंत पोहचविण्यासाठी फेसबुक अकाऊंट, सभासदांसाठी व्हॉटसएप्प ग्रुप, आदि.

 

भविष्यात दुस·या टप्प्यात ऑनलाईन बॅलेन्स, कर्ज, ठेवी, वर्गणी आदि चेकिंग, सुविधा असलेले मोबाईल एप्प्स व इतर सुविधा सुरु करण्याचा मानस आहे.

 

कृपया आमच्या टेक्नोसेव्ही सुविधांचा लाभ घ्यावा.

 

डॉ. सोमनाथ वडनेरे,

उपाध्यक्ष तथा समन्वयक टेक्नोसेव्ही सुविधा उमवि पतपेढी

आणि वेब संपादक, www.nmupatpedhi.com

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.